एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली Highest FDI in Maharashtra itself
विशेष प्रतिनिधी
मुंबई : परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान या वर्षातही कायम राखले आहे. 2023-24 च्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली असून, सर्वाधिक FDI महाराष्ट्रातच आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली. आता 2023-24 च्या दुसर्या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली असून, 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.
एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला आहे.
महायुती सरकारच्या नेतृत्वातील राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. असेच यावरून दिसून येत आहे.
Highest FDI in Maharashtra itself
महत्वाच्या बातम्या
- I.N.D.I.A. आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी ठेवली मोठी अट!
- देवेंद्र फडणवीस जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय!
- प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात राजकीय समतेचा नारा; बारामतीकरांच्या महाविकास आघाडीला दिला बाराचा फॉर्म्युला!!
- लोकसभा निवडणुकीपूर्वी JDUला मोठ झटका, ललन सिंह यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा