विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीका केल्या वरून न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. राजकीय टीका पेलवण्याइतपत न्यायव्यवस्थेचे खांदे मजबूत आहेत. राजकीय नेत्यांनी न्यायमूर्तींवर केलेल्या टिपणीची आम्हाला पर्वा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.High court rules that judiciary should be strong enough to face political criticism
भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,
यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्यात यावी, यासाठी इंडियन बार असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.बुधवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. न्यायव्यवस्थेबद्दल त्यांना जे काही म्हणायचे आहे ते म्हणू द्या. अशा टिपणींसाठी आमचे खांदे भक्कम आहेत. जोपर्यंत आमची सद्सद्विवेकबुद्धी शुद्ध आहे, तोपर्यंत त्यांना जे काही म्हणायचे आहे ते म्हणू द्या, असे न्यायालयाने म्हटले.