• Download App
    पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी अभिनेत्री गहनाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला High court rejects bail plea of Gehna

    पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी अभिनेत्री गहनाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी असलेल्या मॉडेल अभिनेत्री गहना वशिष्ठचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. गहनाच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. धाक दाखवून पीडित महिलांकडून अश्लील वर्तन करून घेतले आणि ते ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदशित केले, असा आरोप तिच्यावर आहे. High court rejects bail plea of Gehna

    यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेमुळे तिने जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई पोलिसांनी तिच्या विरोधात भादंवि कलम ३७० (अश्लिलतेसाठी मानवी तस्करी) दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.



    ज्या महिलांनी याप्रकरणात तक्रार केली आहे, त्या करार करून स्वेच्छेने यामध्ये सहभागी झाल होत्या आणि त्यांनी व्हिडीओचे प्रमोशनही केले होते, असा युक्तिवाद गहनाच्या वतीने करण्यात आला; तर गहनाकडून आर्थिक व्यवहारांची आणि अन्य व्हिडीओबाबत माहिती हवी आहे. त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेत जामीन नामंजूर केला.

    High court rejects bail plea of Gehna

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ