• Download App
    आनंदराव अडसुळ यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही ; सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब|High Court refuses to grant relief to Anandrao Adsul; adjourned hearing till October 8

    आनंदराव अडसुळ यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही ; सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब

    वृत्तसंस्था

    मुंबई : सिटी को- ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.High Court refuses to grant relief to Anandrao Adsul; adjourned hearing till October 8

    ईडीने मनी लॉन्डरिंग कायद्याअंतर्गत अडसूळ यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याविरोधात अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्याची मुभा देत सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.



    ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी अडसुळ यांनी याचिका दाखल केली. तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती. अडसुळ यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात मनमानी पद्धतीने कारवाई केली आहे.

    त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात केली आहे.

    High Court refuses to grant relief to Anandrao Adsul; adjourned hearing till October 8

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस