CBI probe against Home Minister Deshmukh : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह यांनी केलेले सर्व आरोप गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, यात त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज आपला निर्णय दिला आहे. High Court orders CBI probe against Home Minister Deshmukh in Parambir Singh Plea
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह यांनी केलेले सर्व आरोप गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, यात त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज आपला निर्णय दिला आहे.
देशमुख गृहमंत्री म्हणून योग्य चौकशी गरजेची – उच्च न्यायालय
सीबीआयने आपला प्राथमिक तपास अहवाल पंधरा दिवसांत उच्च न्यायालयात सादर करावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खूप गंभीर आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि यामुळे या प्रकरणाची चौकशी निःपक्षपाती असावी.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात असा दावा केला होता की, गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना बार आणि रेस्टॉरंटमधून 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. या हप्ते वसुलीच्या आरोपानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
ज्येष्ठ वकील घनश्याम यांचीही याचिका
ज्येष्ठ वकील घनश्याम उपाध्याय यांनीही याचिका दाखल केली होती. सचिन वाजे, एसीपी संजय पाटील, डीसीपी राजू भुजबळ, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपावरून त्यांनी सीबीआय / ईडी / एनआयए चौकशीची मागणी केली होती. तसेच या प्रकरणात सामील झालेल्या लोकांच्या मालमत्ताही ताब्यात घ्याव्यात, असेही ते म्हणाले.
डॉ. जयश्री पाटील यांनीही उच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती, त्यामध्ये त्यांनी परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परमबीर यांच्या पत्राप्रमाणे त्या सर्व तारखांना अनिल देशमुख यांना त्यांच्या बंगल्यावर कोण-कोण भेटायला आले होते, आणि याच्या पुराव्यासाठी देशमुख यांचा बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Naxal Attack : जगदलपूरमध्ये गृहमंत्री अमित शहांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली, जखमी जवानांचीही घेणार भेट
- राफेल डीलमध्ये भारतीय मध्यस्थाला मिळाले साडेआठ कोटींचं ‘गिफ्ट’, फ्रेंच मीडियाचा दावा
- सौदी माध्यमांनी केले मोदी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक, म्हटले- काश्मीरला मुख्य प्रवाहात आणल्याने दिसू लागले लाभ
- ‘राम सेतू’च्या सेटवरील 45 ज्युनियर आर्टिस्ट्सना कोरोनाची लागण, अक्षयच्या चित्रपटाचे शूटिंग लांबले
- Who Is Naxal Commander Hidma : कोण आहे चकमकीचा मास्टरमाइंड कुख्यात नक्षली हिडमा, जाणून घ्या…