• Download App
    हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजालांची 25 कोटींची नको संपत्ती जप्त; मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीची कारवाई!!|Hero MotoCorp Chairman Pawan Munjal's 25 Crore Unwanted Assets Seized; ED action in money laundering case!!

    हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजालांची 25 कोटींची नको संपत्ती जप्त; मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीची कारवाई!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय सारखा तपास यंत्रणा मार्केट मार्फत चौकशी आणि तपासाचा ससेमिरा लावण्याचा आरोप सातत्याने होत असला तरी ईडीची कारवाई बिलकुलच थांबायला तयार नाही. मनी लॉन्ड्रीगच्या विरोधात ईडीने सुरू केलेल्या मोहिमेत अनेक बड्या माशांवर कारवाई सुरू आहे. यातच आज हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल हे देखील अडकले. ईडीने त्यांची 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली Hero MotoCorp Chairman Pawan Munjal’s 25 Crore Unwanted Assets Seized; ED action in money laundering case!!

    ईडी अधिकाऱ्यांनी हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे ​​सीएमडी आणि अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या दिल्लीतील 3 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत (अंदाजे) 24.95 कोटी रुपये आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 च्या तरतुदीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.



    54 कोटींचे मनी लाँड्रिंग !

    ईडीने मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन अथवा पैसा भारताबाहेर बेकायदेशीरपणे नेल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात होता.

    पवनकांत मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावे विदेशी चलन जारी केलं आणि नंतर परदेशात वैयक्तिक खर्चासाठी त्याचा वापर केला, असं ईडीच्या तपासात उघड झालं आहे.

    पैसा बाहेर पाठवण्यासाठी केलं काय?

    एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचाऱ्यांच्या नावे विदेशी चलन काढून घेतलं. आणि नंतर ते पवनकांत मुंजाल यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला देण्यात आलं. त्यांच्या रिलेशनशिप मॅनेजरने पवनकांत मुंजाल यांना त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक सहलींमध्ये वैयक्तिक खर्चासाठी रोख रक्कम किंवा कार्डद्वारे हे विदेशी चलन पाठवलं. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत एका व्यक्तीसाठी प्रतिवर्षी 2.5 लाख डॉलर्सची मर्यादा तोडण्यासाठी मुंजाल यांनी ही पद्धत अवलंबली होती.

    ईडीने यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी पी. के. मुंजाल आणि संबंधित संस्था आणि लोकांच्या संदर्भात शोध मोहीम राबवली होती. आणि 25 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू तसेच डिजिटल पुरावे आणि इतर पुरावे जप्त केले होते. जप्त केलेल्या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये असल्याचे समजते.

    Hero MotoCorp Chairman Pawan Munjal’s 25 Crore Unwanted Assets Seized; ED action in money laundering case!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना