• Download App
    ‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण...’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला! There is no doubt in my mind that the opponents will find this budget disappointing  Sudhir Mugantiwar

    ‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!

    शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे शिवाय देवेंद्र फडणवीसही पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

    प्रतिनिधी

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा आहेत. शिवाय, राज्यात मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय मदत जाहीर केली जाते, हेही पाहायला मिळणार आहे. दरम्यान विरोधकांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यावर फडणवीस अर्थसंकल्पातून कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. There is no doubt in my mind that the opponents will find this budget disappointing  Sudhir Mugantiwar

    अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘’आजचा अर्थसंकल्प हा चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, भामरागडपासून रायगडपर्यंत व गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी रयतेला समर्पित असा अर्थसंकल्प असणार आहे. दीनदुबळे, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, अनुसिचीत जाती-जमाती, शेतकरी, शेतमजूर व विशेष करून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त महिला सुद्धा या अर्थसंकल्पाच्या केंद्रबिंदू म्हणून या अर्थसंकल्पात प्रतिबिंबीत होणार आहेत.’’


    शेतकऱ्यांना मदत करण्याचे तुम्ही फक्त बोललात तुम्ही फक्त बोललात, पण आम्ही प्रत्यक्ष दिली; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार


    याशिवाय,‘’विरोधकांना हा निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही. त्यांना अर्थसंकल्प चांगला वाटण्याची दूर दूर पर्यंत शक्यता असण्याचं कारणही नाही. जेव्हा त्यांना संधी असते, तेव्हा संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी संधीची माती करण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात होतं आणि आम्ही मात्र सोनं करत, आमच्या दृष्टीने खुर्ची महत्त्वाची नाही. सत्ता महत्त्वाची नाही सत्य महत्त्वाचं आहे, या दृष्टीने आम्ही काम करतो.’’ असंही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

    याचबरोबर ‘’देशाच्या प्रगतीचा जो वेग आहे, तो जगाने सुद्धा कौतुक करावा असा आहे. आता महाराष्ट्राच्याही प्रगतीचा वेग हा इतर राज्यांनी त्याचं अनुकरण करावं असा वेग या अर्थसंकल्पातून प्राप्त होईल. शेतकी असेल किंवा शेवटच्या पंगतीतला गरीबातील गरीब माणूस असेल, त्याला या अमृतमोहत्सवी वर्षात त्याच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा,  प्रकाश निर्माण व्हावा, यासाठी या अर्थसंकल्पाकडे आपण बघितलं पाहिजे.’’ असं शेवटी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

    There is no doubt in my mind that the opponents will find this budget disappointing  Sudhir Mugantiwar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!