• Download App
    Here Ajit Pawar is annoyed, there Nana Patole said he will not talk to the Chief Minister,

    इकडे अजित पवार नाराज, तिकडे नाना पटोले म्हणाले मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, तीनच्या प्रभागावरून महाविकास आघाडीत तिघाडी

    आगामी महापालिका निवडणुकांत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा तिघाडी समोर आली आहे. एका बाजुला उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत तर दुसरीकडे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आता मुख्यमंत्र्यांशी बोलणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे.Here Ajit Pawar is annoyed, there Nana Patole said he will not talk to the Chief Minister,


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा तिघाडी समोर आली आहे. एका बाजुला उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत तर दुसरीकडे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आता मुख्यमंत्र्यांशी बोलणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे.

    पटोले म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीच्या भावना मांडलेल्या होत्या. महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात काय आहे ते कळविले होते. त्या आधारे तीन सदस्यीय प्रभाग सदस्य करावे असं सरकारला कळवलं होतं. आता सरकारने जे निर्णय घेतलेला आहे, त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांसमोर जाऊन विरोध करू. आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळं असतं. आम्ही संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करू.

    महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता इतर सगळ्या महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात बदल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ बैठकीत फेरविचार केला जाईल असे संकेत दिले होते. मात्र महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत. यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.



    पटोले म्हणाले, लोकांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्या आधारे तीन सदस्यीय प्रभाग सदस्य करावे असं सरकारला कळवलं होतं. आता सरकारने जे निर्णय घेतलेला आहे, त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांसमोर जाऊन विरोध करू. आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळं असतं.

    महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता इतर सगळ्या महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात बदल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. ज्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ बैठकीत फेरविचार केला जाईल असे संकेत दिले होते. मात्र महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत. यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

    आमचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे जे काही रिपोर्ट देतील त्याप्रमाणे आशिष देशमुख प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आशिष देशमुख यांच्या वक्तव्यात संदर्भात काही माहिती समोर आली आहे. आता प्रभारींच्या अहवालानंतर निर्णय होईल.

    Here Ajit Pawar is annoyed, there Nana Patole said he will not talk to the Chief Minister,

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल