विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशकातल्या सस्पेन्स दरम्यान आधीचे उघड आणि सध्याचे छुपे प्रतिस्पर्धी आज रामनवमीनिमित्त एकत्र रामचरणी आले. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर झाले असताना नाशिक मधला तिढा मात्र अद्याप कायम आहे. नाशकातून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्यायची की छगन भुजबळ यांना पुन्हा मैदानात उतरवायचे??, यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यात प्रतिस्पर्धा आहे. भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. Hemant Godse should be nominated or Chhagan Bhujbal should be fielded again
या पार्श्वभूमीवर नाशिक मधले पूर्वीचे उघड प्रतिस्पर्धी आणि आत्ताचे छुपे प्रतिस्पर्धी रामनवमीच्या मुहूर्तावर आज काळाराम मंदिरात भर माध्यांनी एकत्र आले. विद्यमान खासदार हेमंत गोडसे काळाराम मंदिरात पोहोचले. त्यांनी रामाचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा घातली आणि तेथून निघाले. तेवढ्यात मंत्री छगन भुजबळ राम मंदिरात पोहोचले. भुजबळांना पाहून हेमंत गोडसे यांच्या जवळ गेले आणि त्यांना खाली वाकून नमस्कार केला. उमेदवारीसाठी आशीर्वाद द्या असे उद्गार त्यांनी काढले. आपण जेष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, असे उद्गार हेमंत गोडसे यांनी काढले. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हशा पिकला. त्यानंतर हेमंत गोडसे मंदिरातून बाहेर पडले छगन भुजबळ यांनी देखील रामाचे दर्शन घेतले प्रदक्षिणा घातली.
त्यानंतर माध्यमानशी बोलताना छगन भुजबळांनी नाशिक मध्ये ज्याला उमेदवारी द्यायची त्याला द्या मी महायुतीच्या प्रचारात उतरणार आहे असे सांगून ते मोकळे झाले. छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर ती कुठल्या पक्षातून मिळेल?? असे विचारल्यावर ती महायुतीतून उमेदवारी मिळेल, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. पण उमेदवारी मिळाली नाही, तरी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असे उत्तर दिल्याने भुजबळांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली किंवा काय??, अशी चर्चा नाशिक मधल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.
Hemant Godse should be nominated or Chhagan Bhujbal should be fielded again
महत्वाच्या बातम्या
- VVPAT प्रकरणात प्रशांत भूषण म्हणाले- स्लिप बॉक्समध्ये टाकली जावी, जर्मनीत हेच होते; सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात 97 कोटी मतदार
- आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांनी केले PM मोदींचे कौतुक, काँग्रेसचा तिळपापड; पदावरून दूर करण्याची मागणी
- RBI Guidelines: ग्राहकाला संपूर्ण माहिती दिल्यानंतरच कर्ज द्या, काही लपविल्यास कारवाई जाणार!
- डेली हंट सर्वेक्षण, 77 लाख सँपल साईज; नरेंद मोदींचा स्कोअर 64 %, राहुल गांधींचा 21.8 %…!!