अभिनेत्री हेमांगी कवीने जागवल्या आपल्या गावच्या आठवणी..
विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी चित्रपट विश्वातील एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी कायमच आपल्या सोशल मीडिया मधून सक्रिय असते. आपली पुरोगामी मतं ती सोशल मीडियातून मांडत असते. आणि त्यामुळे कायम ती चर्चेत राहते. हेमांगी कवीने आतापर्यंत अनेक चित्रपट, सिरीयल, नाटक, कॉमेडी शो या सगळ्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हेमांगी कवी सध्या जरी कामानिमित्त मुंबईत राहत असली तरी तिची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडलेली आहे. हे वेळोवेळी आपल्याला तिच्या अनेक फोटो फोटोमधून ती आपल्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवत असते.Hemangi kavi share memories of her native place …
नुकतीच ती तिचं मूळ गाव असलेल्या म्हसवड गावच्या यात्रेत ती सहभागी झाली होती. त्या गावा निमित्तच यात्रेच्या आणि त्या गावच्या काही आठवणी तिने पोस्टच्या माध्यमातून लिहिल्या आहेत. हेमांगीचं मुळगाव सातारा जिल्ह्यात आहे. प्रत्येकाचं असतं तसं तिचं ही तिच्या गावची घट्ट नातं आहे.. या नात्यामुळेच हेमांगी आपल्या गावात कायम रमते.
सध्या ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी तिच्या गावी म्हसवडला गेली आहे. त्या गावातील तिच्या घरासोबत एक फोटो तिने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. फोटो सोबत ती लिहिते, जगात किती फिरलो, कुठेही फिरलो, किती भारी जागेत राहिलो. तरी गाव ते गावच गावची सर कुठेच येणार नाही.
लहानपणी दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गावी यायचे पण आता कामानिमित्त जमत नाही. वरचेवर गावाला येत असते, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची बातच काही और.. त्यामुळे दोन दिवस का होईना पण मी गावाला येते. मला कोणी सांगितलं की मला गावच नाही,तर मला कससच होत. पण मी त्यांना माझ्या गावी यायच आमंत्रण देते.
आजवर अनेक जण गावी येऊन गेलेत ,राहून गेले त्यामुळे त्यांनाही आता गाव आहे आणि गावाकडच्या आठवणी. गाव नसणं म्हणजे हे आई वडील नसल्यासारखा आहे.. “गाव”नावाची मोठी संपत्ती माझ्या नावावर आहे त्यामुळे मी खूप श्रीमंत आहे.. या शब्दात हेमांगी कवीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Hemangi kavi share memories of her native place …
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेपेक्षा जास्त भेदक क्षेपणास्त्राची इराणकडून निर्मिती, 2,000 किमी पल्ला, अमेरिका-इस्रायलपर्यंत पोहोचण्यास सक्षम
- पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरी धर्मांतर, तिथल्या कोर्टाने पीडितेला त्याच गुंडांच्या ताब्यात दिले; 12 वर्षांत 14000 धर्मांतर प्रकरणे
- सुप्रीम कोर्टात आज नव्या संसदेच्या उद्घाटनावर सुनावणी, राष्ट्रपतींकडून उद्घाटन व्हावे यासाठी याचिका दाखल