विशेष प्रतिनिधी
जळगाव : पोलिसांची नाव ऐकताच थर कापणारे व मुतणारे मी पाहिले मात्र आता पोलिसांचा धाक उरला नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे नेते नेते एकनाथ खडसे यांनी गृहविभागाला घरचा आहेर दिला आहे.जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे केळीचे घड कापून केळी चोरी होण्याच्या घटना घडत आहेत.Hearing the names of policemen, they saw trembling, now there is no fear left, Eknath Khadse’s attack on police
याच पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील चिनावल येथे लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर ताशेरे ओढत पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत.खडसे म्हणाले, पोलिसांचे नाव ऐकताच थर कापणारे व मुतणारे लोक मी पाहिले पण मात्र आता मानवाधिकार असल्याचे सांगितले जाते कशाचा काय मानव अधिकार असे म्हणत चोराला पकडून ठेवला तर तो कुठे मानवाधिकार करणार
, 10 एन सी दाखल झाल्या तर गुन्हेगारांवर पुढची कार्यवाही करता येईल. गेल्या चार दिवसापासून सातत्याने केळीचे खोड कापून चोरीच्या घटना घडत आहेत. एकीकडे त्याचा पोलीस तपास करीत असताना बाजूंच्या गावामध्ये चोरी होत आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक कितपत धाक उरला?
चोर पकडले जातात पण ज्याची चोरी झाली आहे त्यापेक्षाही चोराचा आदरतिथ्य जास्त केला जातो हे माझे अनुभवाचे बोल आहे. गुन्हेगारास पकडून आणल्यानंतर जामिनावर सुटून तो बाहेर पडतो. मात्र तो सुटणार नाही या साठी दुसरे गुन्हे दाखल करून तडीपार किंवा एक दोन वषार्साठी तुरुंगात टाका.
Hearing the names of policemen, they saw trembling, now there is no fear left, Eknath Khadse’s attack on police
महत्त्वाच्या बातम्या
- RUSSIA-UKRAINE WAR : युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
- किरीट सोमय्यांच्या मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- रक्ताच्या वारसदारांकडून दलितांची दिशाभूल; आंबेडकर यांचे नाव न घेता डॉ. राऊत यांचा हल्ला
- महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा थकित रकमेत सवलत, पुन्हा वीज जोडणी देणारी नवी योजना