प्रतिनिधी
नवी दिल्ली : आजचा दिवस कोर्टाचा आहे. ओबीसी आरक्षण, अनिल देशमुख, ज्ञानव्यापी मशीद, ताजमहल आदी विषयांवर आज कोर्टात काही ना काहीतरी सुनावणी आणि निर्देश अपेक्षित आहेत. Hearing on OBC Reservation, Anil Deshmukh, Gyanvapi, Taj Mahal
सुप्रीम कोर्टात मध्यप्रदेश ओबीसी आरक्षणाचा सुनावणी होणार आहे. मध्य प्रदेश सरकारने एम्पिरिकल डाटा कोर्टाला सादर केला त्यावर कोर्ट काय फैसला देते यावर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारचे ओबीसी राजकीय आरक्षण भवितव्य अवलंबून आहे. मध्य प्रदेशने ट्रिपल टेस्ट कशी बनवायचे पूर्ण केली ती टेस्ट कोर्टाला मान्य झाली का? यावर महाराष्ट्र ठाकरे पवार सरकार पुढची चाल खेळणार आहे.
अनिल देशमुख खाजगी रुग्णालयात उपचार करून घ्यायचे आहेत तुरुंगात पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे देशमुखांचे म्हण मी आहे तर इतकेच तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकतात असे त्याचे म्हणणे आहे. यावर आज मुंबई हायकोर्ट सुनावणी घेऊन निर्देश देणे अपेक्षित आहे.
ज्ञानवापी मशिदीत कोर्ट कमिशनरला व्हिडीओग्राफी करायला मुस्लिम समुदायाने प्रतिबंध केला. या मुद्द्यावर दोन्ही याचिका आल्यावर कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यावर कोर्ट सुनावणी घेऊन स्पष्ट निर्देश देण्याची शक्यता आहे.
ताजमहाल मधील 22 खोल्या उघडून त्यांची पाहणी करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व खात्याला देण्या संदर्भातला अर्ज अलाहाबाद हायकोर्टात आहे. त्याची सुनावणी होऊन कोर्ट या 22 खोल्या उघडायला परवानगी देते का?, त्यात नेमके काय सापडते? दावेदाराच्या म्हणण्यानुसार तिथे हिंदू मूर्ती आहेत का? असल्यास त्या संदर्भातल्या वेगवेगळे पुरावे काय आहेत?, याविषयी अलाहाबाद हाय कोर्ट निर्णय देईल त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत.
Hearing on OBC Reservation, Anil Deshmukh, Gyanvapi, Taj Mahal
महत्वाच्या बातम्या
- १० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!
- Census : देशात पहिल्यांदाच ऑनलाईन जनगणना; लाभ पोहोचवण्यातही अचूकता; अमित शहांची घोषणा!!
- 124 ए : देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता सर्वोच्च, त्यात तडजोड नाही!!; राजद्रोह कायद्याबाबत कायदेमंत्री किरण रिजिजू यांची स्पष्टोक्ती!!
- NIA Dawood Ibrahim : एनआयए छाप्यांची व्याप्ती मोठी; दाऊदच्या 30 अड्ड्यांवर छापे; सलीम फ्रुट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया ताब्यात!!