महाराष्ट्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गणेशोत्सवानंतर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. केरळमधील ओणम सणानंतर झालेली रुग्णवाढ सांगून त्यांनी राज्यातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवावरून सावध केले आहे. health officials warn covid 19 cases may surge after ganesh puja in maharashtra
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गणेशोत्सवानंतर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. केरळमधील ओणम सणानंतर झालेली रुग्णवाढ सांगून त्यांनी राज्यातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवावरून सावध केले आहे.
गणेशोत्सवानंतर कोरोना संसर्गात वाढीची शक्यता
राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “सणांनंतर गर्दी वाढते आणि नागरिक कोरोनाचे मूलभूत नियम पाळणे विसरतात. जसे की मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे.” ते म्हणाले की, राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सल्ला जारी केला आहे आणि पाच जिल्ह्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. चाचण्यांची सुविधा तसेच रुग्णांचे विलगीकरण आणि औषध व्यवस्था इत्यादींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
केरळातील ओणमचा दाखला
गेल्या सात दिवसांपासून राज्यात चाचणी सकारात्मकतेचा दर 2.67 टक्के आहे, परंतु अधिकारी आठ जिल्ह्यांमध्ये उच्च चाचणी सकारात्मक दराबद्दल चिंतित आहेत. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत आहेत. दुसरीकडे, लसीकरण मोहीमही सुरू आहे.
आरोग्य अधिकारी म्हणतात की, एकीकडे राज्य सरकारने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याविषयी सांगत आहे, दुसरीकडे कोकणात लोकांना नेण्यासाठी हजारो बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण व्हायरसवर नियंत्रण कसे ठेवू शकतो? 9 फेब्रुवारीनंतर शनिवारी पहिल्यांदा महाराष्ट्रात सर्वात कमी कोरोना रुग्णांची (3,075) नोंद झाली. 361 नवीन रुग्ण मुंबईत आढळले, ज्यामुळे संक्रमित लोकांची एकूण संख्या 16,015 झाली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 64,94,254 लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
health officials warn covid 19 cases may surge after ganesh puja in maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल
- निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!