MP Imtiaz Jalil : राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी रेमडेसिव्हिरच्या वाटपावरून आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री रेमडेसिव्हिर वाटपाच्या बाबतीत भेदभाव करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपापल्या जिल्ह्यात जास्तीचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन जात आहेत. आमच्याकडे मंत्री नसेल तर आम्हाला इंजेक्शन मिळणारच नाही का? आम्ही लावारिस आहोत का, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. Health Minister Tope Not Giving Remdesivir injection For Aurangabad Says MP Imtiaz Jalil
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी रेमडेसिव्हिरच्या वाटपावरून आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री रेमडेसिव्हिर वाटपाच्या बाबतीत भेदभाव करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपापल्या जिल्ह्यात जास्तीचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन जात आहेत. आमच्याकडे मंत्री नसेल तर आम्हाला इंजेक्शन मिळणारच नाही का? आम्ही लावारिस आहोत का, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनावरील उपचारांत वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची लूट केली जात आहे, इंजेक्शन काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा किमतीत विकले जात आहे. आता काही प्रमाणात साठा आलाय, तर सरकारमधले मंत्री आपापल्या जिल्ह्यांना प्राधान्य देताना दिसत आहे. कुणी दहा हजार, कुणी वीस हजार इंजेक्शन घेऊन जात आहेत, असा आरोपही खा. इम्तियाज जलील यांनी केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. इम्तियाज जलील यांनी राजेश टोपे, अमित देशमुख यांचे नाव घेऊन ते मंत्री असल्याचा फायदा घेत रेमडेसिव्हिरची इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात नेत असल्याचा व इतर जिल्ह्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला.
इम्तियाज जलील म्हणाले, सरकारमधील मंत्री असे बेजबादारपणे कसे वागू शकतात. राजेश टोपे हे एका जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. त्यामुळे इंजेक्शनचा साठा आल्यानंतर त्याचे वाटप समान किंवा गरजेनूसार झाले पाहिजे. पण आपण मंत्री आहोत म्हणून जास्तीचे इंजेक्शन आपल्या जिल्ह्याला मिळावे अशा पद्धतीने वागणे चुकीचे आहे.
आमच्याकडे जर मंत्री नसेल तर मग आम्हाला रेमडेसिव्हिरचा साठा मिळणार नाही का? आम्ही काय लावारिस आहोत का? मंत्र्यांनी अशा पद्धतीने वर्तन करणे त्यांना व त्यांच्या पदाला न शोभणारे आहे. गरज लक्षात घेऊन या इंजेक्शनचा पुरवठा केला गेला पाहिजे. काही जिल्ह्यात अतिरिक्त साठा असेल तर तो दुसऱ्या जिल्ह्याला दिला गेला पाहिजे. आमच्याकडे अशी परिस्थिती असली तर आम्ही निश्चितच शेजारच्या जिल्ह्यांना मदत करू, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
Health Minister Tope Not Giving Remdesivir injection For Aurangabad Says MP Imtiaz Jalil
महत्त्वाच्या बातम्या
- आमने-सामने : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा दिला सल्ला ; त्यावर चंद्रकांत पाटलांचा खोचक हल्ला ; पुन्हा रंगले ट्विटर वर वाॅर
- पुणे जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या दुप्पट, दुसऱ्या लाटेततील चित्र ; हॉटस्पॉट गावे ३०८
- MAHARASHTRA LOCKDOWN : राज्यातील किराणा दुकानं सकाळी ७ ते ११ अशी चार तासच सुरू ठेवणार ; राजेश टोपे लवकरच देणार आदेश
- मुश्किल वक्त कमांडो सख्त ! १९ तास काम ; ४८ तासांत मोदी सरकारचे 8 मोठे निर्णय
- ठाकरे सरकार नॉटी जमात, इतरांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खोटे ठरवतेय, अमृता फडणवीस यांचा निशाणा