• Download App
    पुण्यात युवकाला दाढी करणे पडले दोन लाखांना; उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार उघडकीस । He went to shave and lost Rs 2 lakh; Shocking incident in Uruli Kanchan

    पुण्यात युवकाला दाढी करणे पडले दोन लाखांना; उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार उघडकीस

    वृत्तसंस्था

    पुणे : बॅंकेतून काढलेले दोन लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे उरुळी कांचन येथील एका युवकाला चांगलेच महागात पडले. त्याने डिक्कीत ठेवलेली रक्कम चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली आहे. He went to shave and lost Rs 2 lakh; Shocking incident in Uruli Kanchan

    उरुळी कांचन येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील यादव (वय- २५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.



    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकातील एक्सिस बँकेतून यादव यांनी २ लाख काढले. ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयाच्या बाहेर गाडी लावून तो सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला. दाढी झाल्यावर त्याने दुचाकीजवळ आला. तेव्हा, गाडीची डिक्की उघडी दिसली.

    नागरिकांकडे त्याने विचारपूस केली. मात्र कोणीही काही पाहिले नसल्याचे सांगितले. त्यावरून कोणीतरी रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुासर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    He went to shave and lost Rs 2 lakh; Shocking incident in Uruli Kanchan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार भरले; निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालंय; मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

    Pune Shaniwarwada : पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण, खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक, गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण

    Mahadev Jankar : मतचोरीचा मला अनुभव, राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत, विरोधकांचा आरोप योग्यच; महादेव जानकरांची प्रतिक्रिया