• Download App
    मुंबईत कांदिवलीतील हवासा हेरिटेज इमारतीला लागली भीषण आग ; दोन जणांचा मृत्यू , महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखलHavasa Heritage building in Kandivali catches fire in Mumbai; Two killed, Mayor Kishori Pednekar admitted to the spot

    मुंबईत कांदिवलीतील हवासा हेरिटेज इमारतीला लागली भीषण आग ; दोन जणांचा मृत्यू , महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल

     

    आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली.Havasa Heritage building in Kandivali catches fire in Mumbai; Two killed, Mayor Kishori Pednekar admitted to the spot


    विशेष प्रतिनिधी

    मुम्बई : मुंबईतील कांदिवली येथे हवासा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली. या आगीत सुमारे ७ जण अडकले होते, सध्या दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे.

    रात्री आठच्या सुमारास आग लागली होती, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांच्या मदतीने २ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, एक ८९ वर्षांची आहे, तर दुसरी ४५ वर्षांची महिला आहे.

    Havasa Heritage building in Kandivali catches fire in Mumbai; Two killed, Mayor Kishori Pednekar admitted to the spot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!