• Download App
    पवारांचे नाव घेतात...??; घोटाळ्याच्या आरोपांवर नेमकी प्रत्युत्तरे देण्याऐवजी हसन मुश्रीफांनी काढली किरीट सोमय्यांची लायकी |Hasan Mushriff didn't give specific answers to Kirit Somaya's alligations

    पवारांचे नाव घेतात…??; घोटाळ्याच्या आरोपांवर नेमकी प्रत्युत्तरे देण्याऐवजी हसन मुश्रीफांनी काढली किरीट सोमय्यांची लायकी

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे आरोप ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केल्यानंतर त्यांनी संतापून किरीट सोमय्या यांची लायकी काढली आहे.Hasan Mushriff didn’t give specific answers to Kirit Somaya’s alligations

    किरीट सोमय्या यांनी 2700 पानांची डॉक्युमेंट्स ईडीकडे सोपविली आहेत. या घोटाळ्यासंदर्भात थेट प्रत्युत्तर न देता हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांची शरद पवारांचे नाव घेण्याची लायकी तरी आहे काय??, त्यांनी पवारांचे नाव घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. त्यांना ही नावे घेण्यापासून रोखण्यासाठी मी कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे, असे हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



    किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग आरोप केला आहे. त्याचबरोबर गडिंग्लजच्या अप्पासाहेब नलावडे कारखान्यात त्यांच्या जावयाने घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यावर हसन मुश्रीफ यांनी थेट प्रत्युत्तर दिले नाही. ते म्हणाले, की किरीट सोमय्या यांना जी काय तक्रार करायची ती त्यांनी करावी.

    त्याबद्दल तपास यंत्रणा तपास करतील पण घोटाळेबाजांना तुरूंगात टाकीन हे म्हणण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला?? ते काय न्यायाधीश आहेत काय?? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. घोटाळ्यासंदर्भात 2700 पानांचा डॉक्युमेंट संदर्भात त्यांनी कोणतेही थेट प्रत्युत्तर दिले नाही.

    हसन मुश्रीफ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपाबाबत कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणे अपेक्षित आहे. त्यासाठी किरीट सोमय्या आज कोल्हापूरला जात होते. परंतु, त्यांना पोलिसांनी कराड स्थानकावर अडवून ताब्यात घेतले. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्या जावयावर आरोप केले.

    परंतु कोल्हापुरात त्यांना प्रतिबंधित आदेश लागू असल्याने ते कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करू शकले नाहीत. हसन मुश्रीफ एकीकडे किरीट सोमय्यांनी जी काही तक्रार करायची ती करावी, असे म्हटले असले तरी ठाकरे – पवार सरकारने त्यांना कराडमध्ये रोखल्याने ते कागल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकलेले नाहीत.

    Hasan Mushriff didn’t give specific answers to Kirit Somaya’s alligations

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस