विशेष प्रतिनिधी
पुणे – सातारा जिल्ह्यातील चिमणगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्देशानेच कारखान्याची विक्री झाली, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. Has no relations with Guru commodities, claims Ajit Pawar
त्याचवेळी आपल्यावरील आरोप खोडून काढत ज्या गुरू कमोडिटीजने करार करून कंपनी चालवण्यास घेतली. त्या गुरू कमोडिटीजसोबत आपला काहीही संबंध नाही असा दावाही अजित पवारांनी केला आहे. गुरू कमॉडिटी ही अजितदादांचे मावसभाऊ राजेंद्र घाडगे यांची आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले, की मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून जरंडेश्वर कारखान्याची विक्री करण्यात आली. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरले होते. पण यामधील सर्वात जास्त टेंडर गुरू कमोडिटी या कंपनीने भरले होते. त्यांनी 65 कोटींचे टेंडर भरले आणि तो कारखाना विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
Has no relations with Guru commodities, claims Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- बॉलीवूडकडे ईडीचा मोर्चा, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला समन्स, नुकतेच झाले होते लग्न
- ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार
- योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!
- काकाला अडकवण्यासाठी मुनव्वर राणांच्या मुलाने स्वत : वर झाडून घेतल्या गोळ्या, यूपी पोलिसांचा मोठा खुलासा
- माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार