वृत्तसंस्था
मुंबई : हर्षदा दीनानाथ रेडकर हिची ड्रग्ज संबंधातली केस 2008 पासून सुरू आहे. मी त्या वेळेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकरशी माझे 2017 मध्ये लग्न झाले आहे. मग माझा त्या केसशी कसा काय संबंध जोडता येऊ शकतो?, अशा शब्दात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. Harshda has nothing to do with Redkar’s case; Sameer Wankhede’s reply to Nawab Malik
आज सकाळी नवाब मलिक यांनी ट्विट करून हर्षदा दीनानाथ रेडकर ही क्रांती रेडकरची बहिण आहे. तिच्या विरोधात पुणे कोर्टात केस आहे. तिचा समीर वानखेडे तुमच्याशी काही संबंध आहे का?, असा खोचक सवाल केला होता. त्या केसशी संबंधित संबंधित कागदपत्रे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये जोडली होती.
त्याला समीर वानखेडे यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. हर्षदा दीनानाथ रेडकर हिची केस 2008 पासून सुरू आहे. त्यावेळेला मी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सेवेत नव्हतो. क्रांती रेडकरशी माझे 2017 मध्ये लग्न झाले आहे. मग माझा त्या केसशी कसा काय संबंध जोडता येऊ शकतो?, असा सवाल समीर वानखेडे यांनी केला आहे.
Harshda has nothing to do with Redkar’s case; Sameer Wankhede’s reply to Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल