• Download App
    ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन Hanuman Chalisa should be performed in front of the mosques on which the horns have not been lowered

    Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन

    प्रतिनिधी

    मुंबई : राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता, तब्बल 13000 मनसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा, 15000 हजार मनसैनिकांवर पोलिसी कारवाया तरीदेखील न बधता आणि न झुकता राज ठाकरे यांनी आपली मूळ भूमिका कायम ठेवत ज्या मशिदींचे भोंगे उतरणार नाहीत. त्यांच्यासमोर भोंग्यांवर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावाच, असे आदेश काढले आहेत. Hanuman Chalisa should be performed in front of the mosques on which the horns have not been lowered

    राज ठाकरे यांनी कालच ट्विट करून केल्याप्रमाणे आज सायंकाळी आपली भूमिका ट्विटर वरूनच जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारला जबरदस्त आव्हान दिले आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून “भोंगे उतरवा”, हे ऐकत आलो आहोत. आता तुम्ही भोंगे उतरवणार आहात की बेगडी धर्मनिरपेक्ष शरद पवारांचे ऐकणार आहात??, हे एकदा महाराष्ट्राला समजूच द्यात!!, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.



    इतकेच नाही तर राज ठाकरे यांनी आपल्या आवाहन पत्रात फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांना ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे. हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. त्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल आणि या देशात एवढे तुरुंग नाहीत की संपूर्ण हिंदू समाजालाच सरकार तुरुंगात टाकू शकेल!! त्यामुळे आपली दीर्घ लढ्याची तयारी ठेवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या आवाहन पत्रातून केले आहे.

    – संभाजीनगर मध्ये गुन्हा

    राज ठाकरे यांच्यावर आधीच संभाजीनगर मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे. त्यांच्या अटकेची दाट शक्यता आहे. 13000 मनसैनिकांवर आधीच कारवाई झाली आहे. अनेक मनसैनिक भूमिगत झाले आहेत. उद्या मनसे गनिमी काव्याने आंदोलन करणार असल्याच्या बातम्या आहेत.

    या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांचे हनुमान चालीसा लावणारच असे आव्हान दिल्यानंतर मनसैनिक अधिक खवळले असल्यास नवल नाही. यापुढे राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आता पोलीस आणि ठाकरे – पवार सरकार त्यांच्यावर कोणती ॲक्शन घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Hanuman Chalisa should be performed in front of the mosques on which the horns have not been lowered

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!