• Download App
    "मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय", रवी राणा यांचे फेसबुक लाईव्ह; मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणावर ठाम । hanuman chalisa at matoshree : Rana slammed chief minister uddhav thackeray

    WATCH : “मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय”, रवी राणा यांचे फेसबुक लाईव्ह; मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणावर ठाम

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनी संपवायचा आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतो आहे, तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. hanuman chalisa at matoshree : Rana slammed chief minister uddhav thackeray

    “महाराष्ट्राच्या शांतीसाठी आजचा बजरंगबलीचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनि आजच्या दिवशी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली, या उद्देशासाठी जर आमचा विरोध होत असेल. मराठी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखलं जातंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. सत्तेचा दुरुपयोग होतोय.”



    “हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते, तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनि संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं. पोलीस आम्हाला थांबवत आहे. शिवसैनिकांना दारासमोर उभं करून आमच्या विरोधात गुंडागर्दी, हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय.”

    ते म्हणाले, हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये, असे आवाहन रवी राणा यांनी केले.

    hanuman chalisa at matoshree : Rana slammed chief minister uddhav thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते