विशेष प्रतिनिधी
मुंबई : रेणुका शिंदे आणि सीमा गावित या 9 मुलांच्या हत्याकांडातील दोषी बहिणींना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 20 वर्षं उलटूनही फाशीची अंमलबजावणी न झाल्याने फाशीची शिक्षा रद्द करावी अशी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. Hanging till death cancelled; now life imprisonment, High court accept plea of Renuka Shinde, Seema Gawit
कोर्टाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केली. आधी या प्रकरणाचा निकाल 2001 मध्ये लागला होता. त्या निकालात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या बहिणींची फाशी रद्द झाली तरी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून त्यांना मरेपर्यंत कैदेत राहावे लागेल.
संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्या. सारंग कोतवाल आणि न्या. नितिन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. गावित बहिणींना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात कारागृह प्रशासनाने दिरंगाई केली. प्रशासनाच्या या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने हा निकाल देताना नोंदवले.
Hanging till death cancelled; now life imprisonment, High court accept plea of Renuka Shinde, Seema Gawit
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक , पुकारले ठिय्या आंदोलन ; चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात
- नाना पटोलेंच खळबळजनक वक्तव्य, नागपुरातील घराबाहेर वाढवली सुरक्षाव्यवस्था
- १९९० च्या दशकात नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द , मुंबई हायकोर्टाने दिला निर्णय