विशेष प्रतिनिधी
राज्यातील ठाकरे-पवार सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ भ्रष्टाचारामुळे चार महिन्यात एकतर गायब होईल आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता लपून न राहता बाहेर यावे, त्यांनी तात्काळ सरेंडर व्हावे.Half the cabinet will disappear; Half will go to the hospital in just Four Month’s
ठाकरे- पवार सरकारने त्यांना वाचविण्याचे आणि पाठीशी घालण्याचे प्रयत्न करू नयेत. मी राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.ती क्रांतीची सुरवात आहे. हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
ठाकरे- पवार सरकार अलिबाबा चाळीस चोर आल्यासारखे आहे. भ्रष्टाचाराचे धागेदोरे सीएमओ पर्यंत पोचणार आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात अर्धे मंत्रिमंडळ एक तर गायब होणार असून अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असे ते म्हणाले.
- ठाकरे- पवार सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ गायब होणार
- अर्धे मंत्री चार महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाणार
- सरकार भ्रष्टाचारात पूर्ण रुतले आहे.
- अनिल देशमुख यांनी आता सरेंडर व्हावे
- उद्धव ठाकरे- शरद पवार त्यांना किती दिवस पाठीशी घालणार
- ठाकरे- पवार सरकार अलिबाबा चाळीस चोर