भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या माझ्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही क्रांतीची सुरुवात आहे. येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब झालेले असतील तर अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.Half of the ministers will disappear in the next four months, while half will be in hospitals, warns Kirit Somaiya
विशेष प्रतिनिधी
सांगली : भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या माझ्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही क्रांतीची सुरुवात आहे. येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब झालेले असतील तर अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांनीवाघवाडी फाट्यावर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची शपथ घेतली आहे. इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला आहे.
- किरीट सोमय्यांचा आता २८ सप्टेंबरला कोल्हापूर – कागल दौरा; हसन मुश्रीफांविरूध्द करणार पोलीसांत तक्रार
हे सगळे चोर, लुटेरे आणि हत्या करणारे आहेत. माझ्याबाबत त्यांनी फार नाटके केली.वाशीमला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मी डगमगणार नाही. गेल्या वर्षभरात आम्ही ठाकरे सरकारचे २४ घोटाळे बाहेर काढले आहेत. त्याची चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख गायब होतात, देशमुख कुठे आहेत याचा पत्ता फक्त ठाकरे आणि शरद पवार यांनाच माहीत आहे. मुश्रीफ रुग्णालयात दाखल झालेत. आता यापुढे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसेल. हे सगळे भ्रष्टाचारी आहेत.
Half of the ministers will disappear in the next four months, while half will be in hospitals, warns Kirit Somaiya
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानशी संघाची तुलना जावेद अख्तर यांना भोवली; न्यायालयात हजेरीची नोटीस
- उरीमध्ये दहशतवादावर प्रहार, भारताच्या लष्कराने पाक घुसखोराला पकडले, 5 दिवसांत 4 दहशतवादी यमसदनी
- भारताच्या भेदक आकाशच्या यशस्वी चाचणीने चीनची वाढली डोकेदुखी
- १ ऑक्टोबरपासून घरी बसून लाइफ सर्टिफिकेट बनवले जाणार, जाणून घ्या काय त्याची संपूर्ण प्रक्रिया