• Download App
    Amol Mitkari हाके यांनी ओबीसी उमेदवारावर दबाव टाकून

    Amol Mitkari : हाके यांनी ओबीसी उमेदवारावर दबाव टाकून विधानसभा लढवण्यापासून परावृत्त केलं, अमोल मिटकरी यांचा आरोप

    Amol Mitkari

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Amol Mitkari  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील राजकीय वाद चिघळताना दिसत आहे. आता “हीच हाक्याची औकात” अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी हाकेंवर निशाणा साधत एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.Amol Mitkari

    मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, ही क्लिप भोकर मतदारसंघातील असून, हाके यांनी ओबीसी उमेदवारास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आर्थिक व्यवहाराच्या मोबदल्यात दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मुलीच्या निवडणुकीत मदतीसाठीच ही तोडपाणी केली गेली, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.



    मिटकरी यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कुंटे नावाच्या व्यक्तीचा संवाद ऐकायला येतो. ते म्हणतात :“जय ओबीसी! माझ्या पक्षाकडून नामदेव हिलवाड यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी उमेदवारी स्विकारली होती, मात्र नंतर अर्ज मागे घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मण हाके यांचा त्यांच्यावर दबाव होता. जरांगे पाटील यांनीही निवडणूक लढवण्यापासून माघार घेतली. त्यानंतर हाके साहेबांशी बोलणं झालं आणि फॉर्म मागे घेण्यात आला.”

    मात्र त्याच क्लिपमध्ये हाके यांचेही कथित प्रतिपादन आहे की, “मी कोणावर दबाव टाकला नाही. उमेदवारांनी स्वतःहून माघार घेतली असेल. माझा यात काही संबंध नाही.” असे म्हणत त्यांनी संभाषण संपवले आणि कॉल कट केला.

    या क्लिपमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अमोल मिटकरी यांनी याला “ओबीसी समाजाच्या नेत्यांची गद्दारी” असे संबोधले आहे. हाके यांच्याकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

    Hake pressured OBC candidate to dissuade him from contesting the assembly, alleges Amol Mitkari

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!