कोल्हाटी समाजातील मंगल जावळे या एसटी स्टॅण्डवर गाणी गाऊन मिळणाऱ्या शंभर- दोनशे रुपयांत घर चालवतात.
विशेष प्रतिनिधी
पुणे : म्हणतात ना जरी देव दिसत नसला तरी तो अस्तिवात आहे. तसच इथ घडलय.जन्मापासून घरची गरिबी, शिक्षण नाही, पण सुंदर आवाजाची देवाने दिलेली देणगी आहे. या देणगीवरच तिची जगण्याची लढाई जिंकत आहे. ही स्त्री एसटी स्टॅण्डवर गाणं गाऊन स्वतःच कुटुंब चालवते.Hakay’s family cart singing at the ST stand; Mahesh Tillekar honored by giving Paithani and financial help
दरम्यान निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एसटी स्टॅण्डवर गाणं गाऊन कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या या गायिकेचा शोध घेतला.एवढेच नव्हे तर त्यांनी त्या गायिकेला पैठणी आणि आर्थिक मदत देऊन तिचा सन्मान केला.
कोल्हाटी समाजातील मंगल जावळे या एसटी स्टॅण्डवर गाणी गाऊन मिळणाऱ्या शंभर- दोनशे रुपयांत घर चालवतात.मंगल जावळे यांनी गाण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही.त्या रेडिओवर हिंदी, मराठी गाणी ऐकून नंतर आपल्या आवाजात सादर करतात.
महेश टिळेकर यांनी एका अज्ञात गायिकेचा मराठी गाणं गातानाचा व्हिडीओ बघितला होता. त्यानंतर महेश टिळेकर या गायिकेचा शोध घेत तिला भेटायला तिच्या घरी पोहोचले.त्यांच्या आवाजाने भारावून गेलेल्या टिळेकर यांनी मंगल यांना पैठणी साडी आणि आर्थिक मदत केली. मंगल यांच्यासारख्या कलाकारांना मदत करण्यासाठी इतरांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Hakay’s family cart singing at the ST stand; Mahesh Tillekar honored by giving Paithani and financial help
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदू देवदेवतांविषयी केलेल्या विधानाबाबत जितनराम मांझी यांनी मागितली माफी
- तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक
- उध्दव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी
- अबब….दुबईच्या राजाला पत्नीला द्यावी लागणार साडेपाच हजार कोटी रुपयांची पोटगी