विशेष प्रतिनिधी
पुणे : ईव्हीएम हॅक करतो, मला अडीच कोटी द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे करण्यात आली. ही पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीला पुण्यातून सापळा रचत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला एक लाख रुपय घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. Hacks EVM Machines, Give 2.5 Crores: Direct Opposition Leader Ambadas Danve Demands Money; Accused was handcuffed by Pune police
मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आरोपी हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ शेअर करत सविस्तर माहिती देखील दिली आहे. विशेष बाब म्हणजे आरोपीला अटक करण्यासाठी अंबादास दानवे यांच्या भावानेदेखील पुणे पोलिसांना मदत केली आहे.
दानवेंच्या भावाने सापळा रचला
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे ईव्हीएम आहेत, ते सर्व हॅक करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना मारुती ढाकणे या युवकाने वारंवार फोन केला. त्यासाठी अडीच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागितले गेले. या संदर्भात दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी त्या व्यक्तीस अटक केली.
अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटींची मागणी करताना आरोपीने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मदत करण्याचे आश्वासन दिले. ईव्हीएम हॅक करून तुम्हाला संभाजीनगरमध्ये पाहिजे तसा रिझल्ट मिळवून देऊ, असे आरोपीने अंबादास दानवे यांना आश्वासन दिले. त्यानंतर दानवेंनी पोलिसांना फोन करत याबाबतची संपूर्ण माहिती दिली. दानवे यांच्या भावासह पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत आरोपीला अटक केली आहे.
Hacks EVM Machines, Give 2.5 Crores: Direct Opposition Leader Ambadas Danve Demands Money; Accused was handcuffed by Pune police
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांच्या डोळ्यातून अश्रुधारा, अश्रू सुकले सुप्रियांच्या डोळा, अजितदादांच्या भाषणातून बरसल्या नक्कलेच्या धारा!!
- 10 मतदारसंघांमधला प्रचाराचा ताण, घसाही बसला; प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द!!
- पुतिन पाचव्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ; म्हणाले, ‘रशियाचे नेतृत्व करणे पवित्र कर्तव्य’
- अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.