विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्वत्र गुटखा बंद असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरात अवैध मार्गांनी गुटखा येतोच. यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आता अधिक सतर्क झाले आहेत. शहरात गुटखा येणारे मार्गच बंद करण्याची मोहीम आता पोलिसांनी हाती घेतली आहे. या अंतर्गतच शहरात अवैध गुटका, पान मसाल्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. Gutkha and Tobaco releted items of 52 lakhs Are captured from Tempo
एक संशयित मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी टेम्पोवर लक्ष ठेऊन तो ताब्यात घेतला. या टेम्पोमध्ये चक्क अवैध गुटका तसेच पान मसाल्याची पोती आढळली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. परंतु यामागे आणखी कोणाचा हात आहे का ? हे देखील तपासण्याचे काम सुरू आहे.
याटोळीकडून १०० पोती विमल गुटखा, १०० पोती तंबाखू मिळून आले आहे. तसेच एक मालवाहतूक करणारा टेम्पो पण जप्त करण्यात आला. आतापर्यंत पोलिसांनी या आरोपींकडून ५२ लाख २० हजार रुपये किंमती चा मुद्देमाल वाकड पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत तीन आरोपी गणेश वंजी साबळे, संदिप गुलाब ठाकरे आणि विशाल पांडुरंग लवाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- अवैध गुटखा, पानमसाल्याची वाहतूक रोखली
- पिंपरी- चिंचवड पोलिसांनी पकडली टोळी
- टेम्पोतून ५२ लाखांचा गुटखा हस्तगत
- वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली
- २०० पोती गुटखा पोलिसांनी केला जप्त
- पिंपरी- चिंचवडमध्ये येण्याचे सर्व मार्ग रोखले
Gutkha and Tobaco releted items of 52 lakhs Are captured from Tempo
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव
- जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!