• Download App
    महाराष्ट्रात गुंडाराज, महिला दहशतीखाली, कायद्याचे राज्यच उरले नाही, चित्र वाघ यांचा आरोप Gundaraj in Maharashtra, women are under terror, there is no rule of law left, Chitra Wagh alleges

    महाराष्ट्रात गुंडाराज, महिला दहशतीखाली, कायद्याचे राज्यच उरले नाही, चित्र वाघ यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : महाराष्ट्रात सध्या गुंडाराज आहे.कायद्याचा धाक उरला नाही. महिला दहशतीखाली आहेत, अशी टिका भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. Gundaraj in Maharashtra, women are under terror, there is no rule of law left, Chitra Wagh alleges

    ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक यांची बुधवारी रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करीत चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रात सरकार नावाची चीज आहे का? असा सवाल केला. महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत. गुंडाराज सुरू आहे.या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, परंतु ठाकरे सरकार काय करत आहे.



    वाघ म्हणाल्या, फडणवीस सरकारच्या काळात फेरीवाले धोरण पुढे आणले गेले. परंतु आता ते धोरण राबविले जात नसल्यानेच फेरीवाल्यांची संख्या आणि त्यांची मुजोरी वाढत आहे. महिलांचे कार्य करण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत, परंतु त्यावर महिला नाहीत, ही एक शोकांतिका आहे.
    अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

    Gundaraj in Maharashtra, women are under terror, there is no rule of law left, Chitra Wagh alleges

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?