विशेष प्रतिनिधी
ठाणे : महाराष्ट्रात सध्या गुंडाराज आहे.कायद्याचा धाक उरला नाही. महिला दहशतीखाली आहेत, अशी टिका भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. Gundaraj in Maharashtra, women are under terror, there is no rule of law left, Chitra Wagh alleges
ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक यांची बुधवारी रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करीत चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रात सरकार नावाची चीज आहे का? असा सवाल केला. महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत. गुंडाराज सुरू आहे.या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, परंतु ठाकरे सरकार काय करत आहे.
वाघ म्हणाल्या, फडणवीस सरकारच्या काळात फेरीवाले धोरण पुढे आणले गेले. परंतु आता ते धोरण राबविले जात नसल्यानेच फेरीवाल्यांची संख्या आणि त्यांची मुजोरी वाढत आहे. महिलांचे कार्य करण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत, परंतु त्यावर महिला नाहीत, ही एक शोकांतिका आहे.
अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
Gundaraj in Maharashtra, women are under terror, there is no rule of law left, Chitra Wagh alleges
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यासमोरच मनसेने फोडली दहीहंडी; मुंबईत नियमभंग प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल
- काश्मीरमध्ये सैन्य दलाची नवे पाऊल; दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद; आपल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केले आवाहन