• Download App
    Gunaratna Sadavarte: Manoj Jarange Will Go to Jail If He Comes to Mumbai मनोज जरांगे मुंबईत आलेच तर जेलमध्ये जावे लागणार;

    Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे मुंबईत आलेच तर जेलमध्ये जावे लागणार; गुणरत्न सदावर्तेंचा दावा

    Gunaratna Sadavarte

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Gunaratna Sadavarte  मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाचा हा निर्णय येताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत जरांगेंवर टीका केली आहे. तसेच ते मुंबईत आले तर जेलमध्ये जावे लागणार, असा दावा देखील सदावर्ते यांनी केला आहे.Gunaratna Sadavarte

    गुणरत्न सदावर्ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याचे सिद्ध झाले आहे, मी कालच सांगितले होते, जरांगे पाटील मुंबईत येणार नाहीत, मुंबईमध्ये कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. खारघर आणि नवी मुंबईमध्ये तरी जरांगे पाटील यांना परवानगी आहे का? जर आता जरांगे पाटील यांनी काही केले तर थेट त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.Gunaratna Sadavarte



    जरांग्याची भाषा मग्रुरीची

    जरांगेंचे आंदोलन दिसत असले तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. जरांगे कुणाच्या तरी हातातील बाहुले आहे. यापुढे त्याचे कोणतेहा बेकायदा कृत्य चालणार नाही, असा इशारा सदावर्तेंनी दिला. किती माजलाय तो जरांग्या, त्याची भाषा मग्रुरीची आहे. जरांगेला अटक होणे आणि त्याला कायदा कळणे यानंतरच त्याला समजेल असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.Gunaratna Sadavarte

    पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मुद्दा असा आहे, न्यायालयापेक्षा कोणीही मोठे नाही. जरांगेही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. उच्च न्यायालयात दोन याचिका आहेत, एक जनहित याचिका आणि दुसरी माझी याचिका. मुंबई उच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणाच्या सुनावणीत आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत.

    डंके की चोटपर असा हा आदेश

    पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, जे कोणी जरांगेंचे गॉडफादर, मसिहा किंवा मास्टरमाईंड असतील त्यांनी आता जरांगे यांना सांगावे की, आता नो एन्ट्री इन आझाद मैदान. डंके की चोटपर असा हा आदेश आहे. तो प्रत्येकाला लागू आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेला आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. मनोज जरांगे हा काय एवढा मोठा नाही, तो नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. जरांगेला कोर्टाचा आदेश ऐकावा लागेल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेला भेटायला जाणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे.

    न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सहा महिने शिक्षा होऊ शकते

    मनोज जरांगे ज्याप्रकारे बेकायदा आणि परवानगी नसताना बोलत आहेत, लोकांची आई-बहीण काढत आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या याचिकेत टाकल्या आहेत. हे गंभीर गैरवर्तन आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सहा महिने शिक्षा होऊ शकते. आझाद मैदानात दोन आठवडे काही करायचे नाही, न्यायालयाचा निकाल हा सर्वंकष असतो. तो सगळ्यांना बंधनकारक असतो. हे मनोज जरांगेंनी आपल्या डोक्यात घालून घ्यावे, असेही सदावर्ते म्हणाले.

    Gunaratna Sadavarte: Manoj Jarange Will Go to Jail If He Comes to Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्गाला मंजुरी, 3 तासांऐवजी दीड तासात होणार प्रवास

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांना भाजपची विनंती- मुंबईतील मोर्चा पुढे ढकला; गणेशोत्सवात विघ्न आणू नये- मुख्यमंत्री फडणवीस

    Radhakrishna Vikhe Patil : शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ; सरकारने जरांगेंची मागणी केली मान्य; विखे पाटलांची माहिती