• Download App
    गुलाबराव पाटील : बंड नव्हे, उठाव केला; राष्ट्रवादीने आमची चिंता करू नये; बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार!! Gularao patil slams Shivsena and Ncp leaders

    गुलाबराव पाटील : बंड नव्हे, उठाव केला; राष्ट्रवादीने आमची चिंता करू नये; बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : आम्ही बंड नाही तर उठाव केला. आम्ही शिवसेना सोडली नाही. आमची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसने करायची गरज नाही, असे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. Gularao patil slams Shivsena and Ncp leaders

    – गुलाबराव पाटील म्हणाले :

    – आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. 40 आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा नाही, सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते. पण चहापेक्षा किटली गरम. आमचे फोनही घेतले जात नव्हते.

    – हिंदुत्त्वाचे संरक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 1990 वेळी भाजपसोबत पहिल्यांदा शिवसेनेने युती केली. मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. जे मिळाले ते बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मिळाले. आज आम्हाला बंडखोर म्हटले जाते आहे. आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. मला पुन्हा टपरीवर पाठवण्याची भाषा करण्यात आली. टपरीवाला म्हणून मला हिणवलं. पण, लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे.

    – आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊन इथपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्हाला मंत्री केले हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचे पाणी, प्रेते अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो.

    – एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले असे बोलण्यात आले. अहो त्यांचे चरित्र वाचा. त्यांची दोन मुले गेली तेव्हा दिघे साहेबांना त्यांना अनाथांचा नाथ हो सांगितले होते. आज बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील.

    – मोदींचे आभार

    आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. फटाक्याची वात आत्ता लागलेली नाही. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. कोणी फोन उचलायचा नाही.

    – एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते. शरद पवारांसारखे नेते तीन वेळा जळगावमध्ये आले, अजित पवार, जयंत पाटील सगळे आले पण मग आमचं दु:ख काय समजून घ्या. मोदींनी 50 आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे पाटील म्हणाले.

    – चौकडी टोळकं दूर करा

    चार लोकांच्या टोळक्यानं उद्धव ठाकरेंना वहावत नेले. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा. याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवे होते. ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात.

    Gularao patil slams Shivsena and Ncp leaders

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस