• Download App
    गुलाल व्यावसायिकांना ५५ लाखांचा फटका नंदुरबारमध्ये कोरोनाच्या निर्बंधाने उलाढाल ठप्प|Gulal professionals lost in Huge margin;Turnover of Rs 55 lakh has come to a standstill.

    WATCH : गुलाल व्यावसायिकांना ५५ लाखांचा फटका नंदुरबारमध्ये कोरोनाच्या निर्बंधाने उलाढाल ठप्प

    वृत्तसंस्था

    नंदुरबार : महाराष्ट्र सरकारने गणपती विसर्जन मिरवणुकी संदर्भात नियमावली आखून दिली. त्यामुळे गुलाल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे ५५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.Gulal professionals lost in Huge margin;Turnover of Rs 55 lakh has come to a standstill.

    दोन वर्षापूर्वी जिल्हाभरातून गुलालाचा व्यवसाय हा ५० ते ५५ लाखांच्या आसपास होता. परंतु कोरोना नियमावलीमुळे एक ते दोन लाखांच्या आसपास आला आहे.
    नंदुरबार शहरासह जिल्ह्यात जवळपास पंचवीस ते तीस गुलाल व्यवसायिक आहेत.



    प्रत्येक गुलाल व्यावसायिक हा वर्षाला १२ ते १५ हजार बॅग विकत होता. एक बॅग १२० रुपयांना विकली जाते. परंतु,आता मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे कोणीही गुलाल खरेदीसाठी येत नाही. जिथे वर्षाला हजारो बॅगा विकल्या जात होत्या. तिथे आता बोटावर मोजण्या एवढ्या बॅगा विकल्या जात आहेत. त्यामुळे कळत नकळत कोरोनाचा फटका हा गुलाल व्यवसायिकांना देखील बसला आहे.

    • गुलाल व्यावसायिकांना ५५ लाखांचा फटका
    •  गणेश विसर्जन मिरवणुकीला बंदीचा मोठा फटका
    • कोरोना नियमावलीमुळे उलाढाल झाली ठप्प
    • पूर्वी वर्षाला हजारो बॅगांची विक्री होत होती
    • आता बोटावर मोजण्याएवढ्याच बॅग विकतात

    Gulal professionals lost in Huge margin;Turnover of Rs 55 lakh has come to a standstill.

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ