• Download App
    जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटलांनी खडसेंवर साधला निशाणा ; म्हणाले - 'राम तेरी गंगा मैली हो गयी' Gulabrao Patil targets Khadse during Bodwad Nagar Panchayat election campaign in Jalgaon; Said - 'Ram Teri Ganga Maili Ho Gayi'

    जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटलांनी खडसेंवर साधला निशाणा ; म्हणाले – ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’

     

    आमचे कोणतीही बाप, दादा ग्रामपंचायतीचे मेंबर नव्हते आणि आम्ही धोकेबाज किंवा गद्दार पण नाही’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी खडसेंना टोला लगावला आहे.Gulabrao Patil targets Khadse during Bodwad Nagar Panchayat election campaign in Jalgaon; Said – ‘Ram Teri Ganga Maili Ho Gayi’


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारसभा होती.या प्रचार सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ म्हणत नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

    शिवसेनेचा पाच वर्षांचा पिक्चर पाहा

    ‘गेले तीस वर्ष जो पिक्चर तुम्ही पाहिला तरी तुम्हाला कंटाळा येत नाही ‘, दरम्यान आता मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हा सरळ चालणारा हिरो आहे. तेव्हा आता शिवसेनेचा पाच वर्षांचा पिक्चर पाहा.तसेच आमचे कोणतीही बाप, दादा ग्रामपंचायतीचे मेंबर नव्हते आणि आम्ही धोकेबाज किंवा गद्दार पण नाही’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी खडसेंना टोला लगावला आहे.

    ‘राम तेरी गंगा मैली हो गई’

    पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, राज कपूरने पहिला पिक्चर काढला त्यात जे त्यांनी ‘हम ऊस जिस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है ‘ हे गाणे दिले होते. पण काय आहेना आता दहा-बारा वर्षांमध्ये देशाचे चित्र खूप बदललं आहे.



    त्यामुळं राज कपूरचं गाणं बदलून आता ते ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ असं म्हणत गेली तीस वर्षे एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात ३० वर्ष होतो. पण कुठलीच विकासाची कामे झाली नाही तिथं नुसत घराणेशाही झाल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी खडासेंवर केली आहे.

    Gulabrao Patil targets Khadse during Bodwad Nagar Panchayat election campaign in Jalgaon; Said – ‘Ram Teri Ganga Maili Ho Gayi’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा