प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या ज्या बंडखोर आमदारांचा संजय राऊत यांनी बाप काढला त्यापैकी गुलाबराव पाटलांनी गुवाहाटील्या रॅडिसन हॉटेल मधून त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली असून उद्धव साहेबांनी आपल्या 52 आमदारांना सोडले पण ते पवारांना सोडायला तयार नाहीत, असा आरोप गुलाबराव पाटलांनी केला आहे. Gulabrao Patil slapped: Uddhav Saheb released 52 MLAs but he is not ready to release Pawar
एकनाथ शिंदे गटाच्या 52 आमदारांच्या बैठकीत गुलाबराव पाटील यांचे जोरदार भाषण झाले. हे भाषण सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत आमचे बाप काढतात पण संजय राऊतांना आमचा संघर्ष माहिती नाही. 92 च्या दंगलीत मी आणि माझे तीन भाऊ आणि आमचा बाप तुरुंगात होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते मला माहिती नाही. संजय राऊत आम्हाला म्हणतात गुलाबराव पाटलाला परत पानटपरीवर पाठवू. पण त्यांना हे माहिती नाही चुना कसा लावतात?, आम्ही परत आल्यावर त्यांना चुना लावून दाखवू. उद्धव साहेबांनी सुद्धा आपल्यासारख्या 52 आमदारांना सोडले पण थेट शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आपल्याला जे काही मिळाले ते शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळाले हे खरेच आहे पण शिवसेनेचे 80 % वाटा असेल तर आपलाही आपल्याला जे मिळाले त्यात 20 % वाटा आहेच ना.
आपण घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारी माणसे आहोत. आपली शिवसेना सोडायची नाही भूमिका आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत. आपापल्या मतदारसंघांमध्ये लोक आपल्या पाठीशी भक्कम उभे आहेत हे दिसते आहे. दीपक केसरकर अधून-मधून जो हलका दाल तडका देतात, त्याने देखील मजा येत आहे. लोकांना सत्य काय ते समजते. या लढाईत आपण शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहू. शेवटी विजय आपलाच होणार आहे. विधानसभेच्या शक्तिपरीक्षेत पण आपण समोरच्याला डिबेट मध्ये पुरून उरू, असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
गुलाबराव पाटलांनी चुना लावण्याचा भाषेत प्रत्युत्तर दिल्याने गुलाबराव पाटलांचे भाषण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Gulabrao Patil slapped: Uddhav Saheb released 52 MLAs but he is not ready to release Pawar
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत चार मजली इमारत कोसळली : 18 ठार, 15 जणांना वाचवलं, ढिगाऱ्याखाली आणखी अडकल्याची भीती
- 30 वर्षीय आकाश अंबानी करणार जिओचे नेतृत्व : 65 वर्षीय मुकेश यांचा संचालकपदाचा राजीनामा, रिलायन्समध्ये ठरला उत्तराधिकारी
- ADR Election Watch Report : राज्यसभेतील 31 टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी खटले, 87 टक्के कोट्यधीश, वाचा सविस्तर…
- राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे – पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!!