• Download App
    गुजरात : वडोदरामध्ये केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट , ४ कामगारांचा मृत्यू ; १० जखमीGujarat: Massive blast at a chemical factory in Vadodara, killing 4 workers; 10 injured

    गुजरात : वडोदरामध्ये केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट , ४ कामगारांचा मृत्यू ; १० जखमी

    स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू आल्यावर त्यांना रेल्वेचा अपघात किंवा भूकंप झाल्यासारखे वाटले.Gujarat: Massive blast at a chemical factory in Vadodara, killing 4 workers; 10 injured


    विशेष प्रतिनिधी

    गुजरात : गुजरातच्या वडोदराजवळील इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरियामध्ये असलेल्या कँटन लॅबोरेटरी कंपनीच्या बॉयलरचा शुक्रवारी अचानक स्फोट झाला.या स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली. दरम्यान या स्फोटात चार मजुरांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.



    या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले.स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू आल्यावर त्यांना रेल्वेचा अपघात किंवा भूकंप झाल्यासारखे वाटले.घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून घटनेच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे.

    सुरक्षा साधनांच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सुरक्षेसाठी या कारखान्यात कोणतेही साधन उपलब्ध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित कुटुंबीयांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

    Gujarat: Massive blast at a chemical factory in Vadodara, killing 4 workers; 10 injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!