• Download App
    CoronaVirus News : पुण्यात किराणा दुकाने सुरुच राहणार ; पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   ।Grocery shops will continue as per current rules, clarification from Municipal Commissioner

    CoronaVirus News : पुण्यात किराणा दुकाने सुरुच राहणार ; पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातील किराणा मालाची दुकाने पूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे म्हणजेच सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. Grocery shops will continue as per current rules, clarification from Municipal Commissioner
    राज्य सरकारच्या लॅाकडाऊन सदृश्य नियमावलीची अंमलबजावणी पुण्यामध्ये सध्या होणार नसल्याचे यानिमिताने स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारचे आदेश आल्यानंतरच या नियमावलीची अंमलबजावणी केली जाईल, ‌असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.



    राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत बैठक पार पडली. यामध्ये किराणा दुकाने चारच तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. या नियमांची अंमलबजावणी कधीपासून हे मात्र स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे वेगवेगळे मेसेज व्हायरल होत आहेत. घाबरुन लोक खरेदीसाठी धावपळ करत आहेत. पण या नियमांची अंमलबजावणी मंगळवारपासून ( ता. 20) पुण्यात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
    राज्य सरकारकडून कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. हे आदेश मिळाल्यानंतरच याची अंमलबजावणी जाहीर करणारे नवे आदेश महापालिका लागू करेल. त्यामुळे सध्या नियमांप्रमाणेच दुकाने सुरु राहतील.

    Grocery shops will continue as per current rules, clarification from Municipal Commissioner

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस