विशेष प्रतिनिधी
पुणे : इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक. Greetings to the early revolutionary Narveer Umaji Naik
नरवीर उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली ३ फेब्रुवारी १८३२ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील कारागृहात (सध्या मामलेदार कचेरी) वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत फाशी गेले.
उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते . गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या आद्य क्रांतीवीराला विविध संघटनांतर्फे गुरुवारी अभिवादन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी, पुणे तर्फे उमाजी नाईक यांचा 190 व्या पुण्यतिथी निमत्ती मामलेदार कचेरी शुक्रवार पेठ पुणे येथील अर्धपुतळ्याला मुन्वरभाई कुरेशी (शहर अध्यक्ष) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक रामोशी राज्य संघटना अध्यक्ष अप्पा चव्हाण संयोजक दिपक ओहोळ, जितेंन्द्र जाधव,महेश कांबळे, विवेक लोंढे,बाळासाहेब बनसोडे अनिता छत्रे, किरण चव्हाण,संपत भाकर आदी उपस्थित होते.
Greetings to the early revolutionary Narveer Umaji Naik
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसला मत म्हणजे भाजपला अप्रत्यक्ष मत, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल म्हणतात गोव्यातील मुकाबला भाजप आणि आपमध्येच
- वडील आणि काकांचे ऐकत नाही तो तुमचे काय ऐकणार, अखिलेश यादव यांना टोला मारत अमित शाह यांचा जयंत चौधरी यांना सवाल
- माजी आमदाराचे तिकिट चोवीस तासांत कापून अखिलेश यादव यांनी दिली बिकिनी गर्लला उमेदवारी
- भाजपने उत्पलला नाही तर उत्पने भाजपला नाकारले, काहींना त्यांचे राजकारण संपवायचे आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप