• Download App
    पर्यटकांना मोठा दिलासा , बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली अजिंठा लेणी बससेवा पुन्हा सुरूGreat relief to the tourists, Ajanta Leni bus service which was closed for many days resumed

    पर्यटकांना मोठा दिलासा , बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली अजिंठा लेणी बससेवा पुन्हा सुरू

    औरंगाबाद आणि परिसरात आरोग्यदायी हिवाळ्याचे वातावरण असून आगामी काळात पर्यटकांची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा आहे.Great relief to the tourists, Ajanta Leni bus service which was closed for many days resumed


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरणाऱ्या मागणीमुळे गेल्या महिनाभरापासून संप पुकारला आहे. संपामुळे अजिंठा लेणीतील बससेवा बंद होती.दरम्यान ही बससेवा बुधवारपासून म्हणजे कालपासून सुरु करण्यात आली आहे.यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय झाली आहे.



    औरंगाबाद आणि परिसरात आरोग्यदायी हिवाळ्याचे वातावरण असून आगामी काळात पर्यटकांची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा आहे.बुधवारी सोयगावा आगाराने ६ बस आणि १० कर्मचारी लेणी परिसरात तैनात केले. फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी या दरम्यानची वाहतूक आता बसमुळे सुरुळीत झाली आहे.

    सोयगाव आगारात आता लेणीपर्यंत बससेवा सुरळीत केली आहे. दरवर्षी या काळात सोयगाव आगाराला अजिंठा लेणीतून रोज जवळपास दोन लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मात्र यंदा संपामुळे ७२ लाख रुपयांचा फटका बसला आहे.

    Great relief to the tourists, Ajanta Leni bus service which was closed for many days resumed

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना