• Download App
    Waqf Board फडणवीसांनी डोळे वटारताच Waqf बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा जीआर रद्द!!

    Waqf Board फडणवीसांनी डोळे वटारताच Waqf बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा जीआर रद्द!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सध्या काळजीवाहू सरकार असताना प्रशासनाने परस्पर Waqf बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा जीआर काढला. शिंदे – फडणवीस सरकारनेच जुलै महिन्यामध्ये Waqf बोर्डाला 20 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विश्व हिंदू परिषदेने त्या निर्णयाला ठाम विरोध केला होता. त्यावेळी Waqf बोर्डाला ते पैसे दिले नव्हते. GR to give Rs 10 crore to Waqf Board cancle

    मात्र, निवडणूक होऊन महायुतीचे सरकार आता अधिकार स्थानी बसण्यापूर्वीच प्रशासनाने जुन्या निर्णयाचा जीआर काढला होता. त्यानुसार राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विभाग Waqf बोर्डाला 10 कोटी रुपये देणार होते. परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्या जीआर वर आक्षेप घेताच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी संबंधित जीआर मागे घेण्याचे आदेश दिले.

    तरी देखील फडणवीसांनी ट्विट करून हा जीआर निघाला कसा??, राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, अशावेळी हा जीआर कोणी काढला??, याची नियमानुसार चौकशी करू असे त्यांनी या ट्वीट मधून स्पष्ट केले. त्याचबरोबर Waqf बोर्डाच्या कायदेशीर अस्तित्वाचाच मूळात प्रश्न असताना बोर्डाला 10 कोटी रुपये देणे योग्य नसल्याचा निर्वाळा महाराष्ट्र भाजपने दिला. देवेंद्र फडणवीस आणि भाजप आक्रमक झाल्यानंतर संबंधित जीआर रद्द झाला.

    GR to give Rs 10 crore to Waqf Board cancle

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नाशिक मध्ये मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन; जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

    आधीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून देणाऱ्या मुंबईत असदुद्दीन ओवैसींचा AIMIM पक्ष एकटा देणार 50 उमेदवार; कुणावर होणार परिणाम??

    Amol Mitkari : अमोल मिटकरींची अंजली दमानियांवर टीका, इतकाच अभ्यास UPSCसाठी केला असता तर..