प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड यासाठी पदभरती परीक्षा टीसीएस, आयबीपीएस अंतर्गत घेतल्या जाणार आहेत. या माध्यमातून तब्बल 75000 पदे भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे. Govt Job Opportunity : Recruitment of 75000 Posts in Maharashtra; Shinde-Fadnavis government’s decision
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. तसेच या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगाभरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. यानुसार आता पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांची निवड करण्यात आली आहे.
Railway Jobs : रेल्वेत नोकरीची संधी!!; कोणत्या पदांवर भरती??; पगार किती??
गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांवर लवकरच भरती निघणार आहे.
रिक्त जागा का वाढल्या?
दरवर्षीची सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती यामुळे बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, पशुसंवर्धन या विभागांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत.
Govt Job Opportunity : Recruitment of 75000 Posts in Maharashtra; Shinde-Fadnavis government’s decision
महत्वाच्या बातम्या
- भाजप पाठोपाठ राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत इनकमिंग
- बॉलिवूड नटी नोरा फतेहीला बांगलादेशात मनाई; आर्थिक खस्ता हलतीचे दिले कारण
- रशिया – युक्रेन युद्ध भडकण्याचा धोका; भारतीयांना लवकर युक्रेन सोडायचा सल्ला; दूतावासाची सूचना जारी
- PFI च्या गुप्त बैठका घेणाऱ्या म्होरक्यासह तिघांना एटीएस कडून पनवेलमध्ये बेड्या
- दिवाळीत महागाईचा फटका : एसटीचे भाडे 10 % वाढले, पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची तिप्पट भाडे वसुली