वृत्तसंस्था
पुणे : विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद मिटण्याची चिन्हे आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुद्द राज्यपालांनी या मुद्यावर चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. Governor BhagatSinh Koshyari invites Cm Uddhav thackeray And DCM Ajit Pawar for discussion Over Appoint 12 MLC
राज्यात दीड वर्ष १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद सुरु आहे. पण, हा वाद निकाली निघण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्याआमदार नियुक्तीसंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी दोघांना आता चर्चेसाठी बोलावले आहे.
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चर्चेचं निमंत्रण दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यापालांची भेट घेऊन चर्चा करतील. अशी माहिती खुद्द अजित पवार यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे.
स्वातंत्र्यदिनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी १२ आमदारांच्या मुद्द्यावर राज्यपालांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरकारमधील नेते काही म्हणत नाहीत किंवा तसा आग्रह धरत नाही, असं राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री स्वत: राज्यपालांशी चर्चा करणार आहेत.
Governor BhagatSinh Koshyari invites Cm Uddhav thackeray And DCM Ajit Pawar for discussion Over Appoint 12 MLC
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाचे डेस्टीनेशन : मणिपूरच्या एका शेतक-याने केली कमाल, तांदळाच्या चक्क 165 प्रजातींचा लावला शोध
- जो बायडेन यांचा पुनरुच्चार, सैनिकांवर हल्ला झाला तर देणार चोख प्रत्युत्तर, आतापर्यंत १३ हजार जणांची सुटका
- तालिबानचा म्होरक्या पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात; परदेशातील गुप्तचर यंत्रणांना लागला सुगावा; भारताला पुरवली माहिती
- तब्बल ४५०० फूट व्यासाचा आणि १.४ किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावतोय
- उत्तर प्रदेशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अवघी पाचशेच्या आत; रविवारचे सारे निर्बंध शिथिल