- अशोक चव्हाण आणि नवाब मलिक उपस्थित राहणार नाहीत
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारचा विरोध डावलून राज्यपाल भगतसिंग कोशियारी आता मराठवाडा दौऱ्यावर पोचले आहेत. राज्यपालांच्या कोकणच्या पूरग्रस्त दौऱ्यावर ठाकरे – पवार सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी तर त्यापुढे जाऊन राज्यपालांवर वैयक्तिक टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आपला मराठवाडा दौरा रद्द न करता तो पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दौऱ्यात मराठवाड्यातले पालक मंत्री अशोक चव्हाण आणि नबाब मलिक हे गैरहजर राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यातून ते प्रोटोकॉल तोडत आहेत. Governor bhagatsingh koshiyari on marathwada tour dispite thackeray – pawar government’s opposed it
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी नुकतीच चिपळूण येथील पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांचा व्यथा समजून घेतल्या, तेथील आढावा घेतला. त्याचे राज्य मंत्रिमंडळात ठरल्याप्रमाणे पडसाद उमटले. राज्यपालांनी दौरा करून राज्यात दोन सत्ताकेंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आक्षेप घेत मुख्य सचिवांच्या मार्फत मंत्रिमंडळाची नाराजीही राज्यपालांपर्यंत पोहचवली होती.
देशात रामराज्य येईल तेव्हा संकल्पपूर्ती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
मात्र असे असूनही राज्यपाल गुरुवारी, ५ ऑगस्ट रोजी नांदेडच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर पोचले असून तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ते आढावा बैठकाही घेणार आहेत. त्यामुळे राज्यपालांनी एक प्रकारे राज्य मंत्रिमंडळाला ‘मला गृहीत धरू नका’, असा संदेश दिला आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
आक्षेपानंतरही दौरा रद्द नाहीच!
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचा मराठवाड्याचा तीन दिवसांचा दौरा हा पूर्वनियोजित असून बुधवारी मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही त्यांनी तो रद्द न करता ते दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री या वेळी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. राज्यपाल तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेणार आहेत. यालाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. याबाबत मंत्रिमंडळाची नापसंती राज्यपालांना कळविण्यात आली.
कोरोना, पूरपरिस्थितीचा आढावा राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत घ्यायचा असतो, प्रत्यक्ष दौरा करायचा नसतो, राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये, तसेच स्वतःला मुख्यमंत्री समजू नये, असे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले होते. मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होईल, असे राजभवनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
– पालकमंत्री अशोक चव्हाण, नवाब मलिकांची पाठ!
राज्यपाल कोशियारी यांच्या दौऱ्याच्या वेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नाहीत. गेल्या आठवड्यात राज्यपाल कोकण येथील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असता उदय सामंत आणि तटकरे हे अनुक्रमे रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री उपस्थित होते.
Governor bhagatsingh koshiyari on marathwada tour dispite thackeray – pawar government’s opposed it
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीतील मुलीवरील अत्याचारावरून विरोधक आक्रमक, केजरीवालांकडून चौकशीचे आदेश
- ड्रग्स प्रकरणात फरार ममता कुलकर्णीची याचिका फेटाळण्यात आली, न्यायालयाला सांगितले – औषधांसाठी पैसेही शिल्लक नाहीत
- Tokyo Olympics : विनेश फोगटने कुस्तीची उपांत्यपूर्व फेरी गाठली, स्वीडनच्या सोफिया मॅटसनला 7-1 ने पराभूत केले
- मध्य प्रदेशमध्ये पुराच्या विळख्यात 1200 पेक्षा जास्त गावे, सुमारे 6 हजार लोकांना वाचवले
- भारतीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ईडीने फ्लिपकार्टला 100 अब्ज रुपये दंडाचा इशारा दिला
- उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी प्रियांका गांधीच असतील पक्षाचा चेहरा, काँग्रेस एकट्याने सर्व जागा लढवणार