विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नाशिक येथील जैन समाजाच्या ‘णमोकार तीर्थक्षेत्र’ येथे ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा’ आयोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. Namokar pilgrimage
णमोकार तीर्थ’ हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, तसेच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महोत्सवाच्या अनुषंगाने तात्काळ आणि दीर्घकालीन कामांचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना यावेळी दिले.
‘णमोकार तीर्थ’ हे धार्मिक श्रद्धेचे आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र असून, येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी रस्ते, पार्किंग, तात्पुरती निवासव्यवस्था यांसारखी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. दीर्घकालीन विकासासाठी करता येणाऱ्या कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, जेणेकरून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधून त्यांचा विचार होऊ शकेल. विकास आराखड्यातील स्थायी आणि अस्थायी कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करावी. तसेच विभागीय आयुक्त, स्थानिक प्रशासन आणि आयोजन समितीने एकत्रितपणे सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, आमदार राहुल आहेर, उत्सव समिती सदस्य आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Government’s special attention for the development of tourism at Namokar pilgrimage site of the Jain community in Nashik
महत्वाच्या बातम्या
- भारताचे जागतिक व्यापार करार वाढले, तर उत्पादन क्षेत्रात भारताची मोठी झेप; जागतिक बँकेची ग्वाही
- Nirav Modi : नीरव मोदी म्हणाला- भारतीय तपास संस्था छळतील, प्रत्यार्पण प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी लंडन न्यायालयात याचिका दाखल केली
- Bombay High Court : मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांना हटवले, एक लाच घेतल्याबद्दल दोषी आढळले, तर दुसरे जप्त केलेल्या ड्रग्जचा वापर करत होते
- युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरेंना 35 वे वर्ष का लागले??