• Download App
    Devendra Fadnavis एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची सरकारची योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

    Devendra Fadnavis एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची सरकारची योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis  यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.

    विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके सध्या मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. Devendra Fadnavis

    केंद्रातील मोदी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा धोरण अंमलामध्ये आणतानाच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेत देण्यावर भर दिला. महायुतीच्या फडणवीस सरकारनेही त्याचेच अनुकरण करत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

    Government plans to conduct all MPSC competitive exams in Marathi : Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस