• Download App
    Government introduces लैंगिक शोषण रोखण्यासाठी सरकारची

    Government introduces : लैंगिक शोषण रोखण्यासाठी सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

    Government introduces

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: Government introduces बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांसाठी नवा निर्देश जारी केला आहे. या नियमावलीनुसार, शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.Government introduces

    नवीन नियमावलीमध्ये प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच कॅमेऱ्यांचे फुटेज किमान एक महिना जपून ठेवणे आवश्यक आहे. ‘गुड टच, बॅड टच’ सत्रांचे आयोजन करण्याचीही शाळांना आदेश देण्यात आले आहेत. शालेय कर्मचाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच चारित्र्य प्रमाणपत्र घेणे आवश्यक ठरवले आहे. या नियमांचे पालन न केल्यास शाळेच्या सरकारी अनुदानावर बंदी किंवा शाळेची मान्यता रद्द होण्याची कारवाई केली जाऊ शकते.



    हा निर्णय ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर आधारित आहे. या घटनेनंतर शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हे नवे नियम लागू करण्यात आले.

    राज्य सरकारने जारी केलेल्या १३ मे २०२५ रोजीच्या जीआरनुसार, शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की १८ वर्षांखालील व्यक्तींना अल्पवयीन मानले जाईल, आणि शाळेत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्यास त्याची माहिती त्वरित स्थानिक पोलिसांना किंवा बाल कल्याण पोलीस विभागाला देणे आवश्यक असेल.

    नवीन नियमावलीमध्ये इतर महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

    शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य.

    महिला शिक्षकांची नियुक्ती शक्य असल्यास पूर्व-प्राथमिक ते इयत्ता सहावीपर्यंत केली जावी.

    शालेय कर्मचाऱ्यांची कसून तपासणी आणि चारित्र्य प्रमाणपत्र घेणे.

    बसचालकांसह इतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे अल्कोहल चाचणी करणे.

    प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असणे अनिवार्य.

    शाळेच्या आवारात चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ लावणे.

    शाळेत गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजद्वारे सूचना देणे.

    मानसिक दबावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रे आयोजित करणे.

    लहान मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबद्दल माहिती देणे.

    Government introduces new guidelines for schools to prevent sexual abuse

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवार NDA सोबत असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; हा रामदास आठवलेंचा टोला, टोमणा की जखमेवर मीठ??

    CM Fadnavis : सीएम फडणवीस म्हणाले- आमच्या तिघांमध्ये आता स्पीड ब्रेकरला जागा नाही; महामुंबई मेट्रो 9चा चाचणी टप्पा पूर्ण

    Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मीडियालाच घाई, अजित पवार म्हणाले चर्चा झालीच नाही!