• Download App
    अजितदादा भाजपला धक्का द्यायला गेले; फडणवीसांच्या एका "पंच"मध्ये मागे आले!!; साखर कारखान्यांबाबत शासन निर्णय मागे Government decision regarding sugar mills reversed

    अजितदादा भाजपला धक्का द्यायला गेले; फडणवीसांच्या एका “पंच”मध्ये मागे आले!!; साखर कारखान्यांबाबत शासन निर्णय मागे

    प्रतिनिधी

    मुंबई : अजितदादा भाजपच्या सत्तेमध्ये येऊन भाजपलाच धक्का द्यायला गेले, पण फडणवीसांचा एक “पंच” खाऊन मागे आले, असे घडले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार असले तरी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते मुख्यमंत्री आणि इतरही मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले. मात्र, आता अजित पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे. Government decision regarding sugar mills reversed

    अजित पवार यांनी साखर कारखान्यांबाबत काढलेल्या शासन निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी मागे घ्यायला लावला आहे. भाजपच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.

    भाजप बरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर नवीन शासन निर्णय काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखानदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता भाजपच्या दबावामुळे अजितदादांवर हा निर्णय 8 दिवसांतच मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

    राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच एनसीडीसी मंजूर केलेले 549.54 कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल, तर कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे आणि कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा, तसेच गहाणखत आणि अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी लादण्यात आल्या होत्या.

    या संबंधीचा शासन आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी च्या माध्यमातून काढला होता. मात्र, याचा फटका भाजप नेत्यांच्या कारखान्यांना बसणार होता. अखेर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आला.

    भाजप नेत्यांचे कारखाने

    सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना 113.42 कोटी – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना 150 कोटी आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखाना 75 कोटी – दोन्ही कारखाने माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित

    लातूर जिल्ह्यातील किल्लारी औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना 50 कोटी – भाजप आमदार अभिमन्यू पवार

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना 34.74 कोटी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना 126.38 कोटी – भाजप खासदार मुन्ना महाडिक

    यातले रावसाहेब दानवे वगळता बाकी सगळे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. पण ते मध्यंतरी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले. त्यांनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारले. पण या नेत्यांना अजित पवारांनी भाजपबरोबर सरकारमध्ये येताच धक्का देण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीस यांनी अजितदादांचा तो आदेश मागे घ्यायला लावला.

    Government decision regarding sugar mills reversed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!