• Download App
    Ajit Pawar महिला अत्याचारातील आरोपींवर मकोका लावण्याचा सरकारचा विचार

    Ajit Pawar : महिला अत्याचारातील आरोपींवर मकोका लावण्याचा सरकारचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार यची माहिती

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Ajit Pawar महिलांवरील वाढत्या अत्याचारांसदर्भात राज्य सरकार आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ (मकोका) लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून विधी व न्याय विभागाला याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.Ajit Pawar

    पवार म्हणाले , महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिले पाहिजे म्हणून सरकारची कठोर भूमिका असते. कायदे करण्याचे प्रयत्न सुरु आहे. असे प्रकरणे घडल्यानंतर आरोपी, तपास, चौकशी, पुरावे आदी न्यायालयीन प्रक्रियेत खटला सुरूच असतो. तोपर्यंत आरोपीवर ‘मकोका’सारखे कलम लावण्यासंदर्भात सरकार चाचपणी करत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारीही सकारात्मक आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणात या कायद्याची अंमलबजावणी करता येणार का याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाला सूचना केल्या आहेत.



    महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर समाजातून तीव्र भावना व्यक्त केल्या जातात. सत्ताधारी, सरकार, पोलीस-तपास यंत्रणांवर टीका करण्यात येते. मात्र, वस्तुस्थिती समोर येईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे, असे मत पवार यांनी व्यक्त करताना कोंढव्यातील घटनेचा दाखला दिला.

    कोंढवा येथील बलात्काराच्या घटनेत संबंधित तरुणीच्या माहितीत विसंगती आढळून आली आहे. यावर अजित पवार म्हणाले, कोंढवा येथील घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास केला. या तपासादरम्यान वेगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. ‘संबंधित तरुण-तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून मित्र आहेत. ते नियमीत एकमेकांना भेटायचे, दोघांमध्ये संभाषण असायचे. तरुणीनेच त्याला फोन करून घरी बोलावले होते, कुठलाही स्प्रे मारला नाही,’ असे तपासात समोर आले. परंतू, समाजात वेगळीच माहिती गेली असून पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती समोर मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. या तरुणीने तक्रार करण्याचे कारण काय? याबाबतही तपास करण्याबाबत आदेश दिले आहेत, असेही पवार यांनी सांगितले.

    Government considering imposing MCOCA on women atrocities accused, says Deputy Chief Minister Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राज्य ताब्यात घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र; पण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतले अजितदादा झाले माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष!!

    Kunal Kamra, : कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर, सोमवारी नोटीस येण्याची शक्यता

    Devendra Fadnavis : मराठीवर शब्दही नाही, विजयोत्सव नव्हे तर उध्दव ठाकरेंची रुदाली, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल