विशेष प्रतिनिधी
अमरावती : एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केली.पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर संभाजी राजे यांनी अमरावतीत राज्यसरकारला एक गंभीर इशारा दिला आहे. Government Committee on MPSC Should be established: Sambhaji Raje
आत्महत्या हा पर्याय नसून सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा. रखडलेल्या एमपीएससीबाबत समिती स्थापन करावी. सरकारने लक्ष न घातल्यास आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
- एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी
- राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा
- स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संताप
- सरकारने लक्ष न घातल्यास विचार करावा लागेल