नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज एक खळबळजनक आरोप करून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगळ्याच दिशेने न्यायचा घाट घातल्याची चुणूक दाखविली.Goud Bengal has added 96 lakh people to the voter lists; Does Raj Thackeray want
राज ठाकरे यांनी गोरेगाव मध्ये मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाने भाजप यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी 96 लाख मतदार हे मतदार याद्यांमध्ये घुसविल्याचा दावा केला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात तब्बल 96 लाख मतदार याद्यांमध्ये घुसविले आहेत. त्याबद्दल तुम्ही सावध राहा. ठिकठिकाणी जाऊन मतदार याद्या तपासा. खोट्या मतदारांना जाळ्यात ओढा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.
पण त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे यांनी निवडणुका शांततेत घ्यायच्या असतील, तर सगळी मतदार यादी शुद्ध करा. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. निवडणुका घेतल्यात तर याद राखा, अशी दमबाजीची भाषा वापरली. राज ठाकरे यांनी वापरलेल्या या भाषेमुळेच यांनी मतदार याद्यांच्या निमित्ताने अख्खी महाविकास आघाडी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या दिशेने खेचायचे ठरवले आहे का??, असा सवाल तयार झाला. कारण दोनच दिवसांपूर्वी सगळ्या विरोधकांबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा जोरदार आवाज उठवून मतदार याद्यांवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने निवडणुका रेटून घेण्याचा प्रयत्न केलाच, तर महाविकास आघाडी पुढचे पाऊल उचलेल असे सूतोवाच्या सुद्धा केले होते. अर्थात त्या पत्रकार परिषदेत त्यावेळी शरद पवार उपस्थित नव्हते. ते दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाकडे सुद्धा गेले नव्हते. पण म्हणून बाकीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्यापासून त्यांनी रोखले सुद्धा नव्हते.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज केलेले भाषण हे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या दृष्टीने केलेले सूतोवाच होते याचीच चुणूक दिसली.
कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे निवडणुका कोणत्याही स्थितीत 31 जानेवारी पर्यंत घ्याव्याच लागतील केवळ विरोधी पक्षांनी मागणी केली म्हणून त्या निवडणुका पुढे ढकलता येणे शक्य नाही अशा स्थितीत आपली तयारीच नसेल, तर निवडणुकांवर बहिष्कार घालू अशा पद्धतीची सूचना आल्यास किंबहुना राज ठाकरे यांनी सूचना केल्यास त्यात नवल वाटायचे कारण नाही. कारण राज ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेऊन जसा फारसा फायदा होणार नाही, तसा तोटाही होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या हातात सध्या लोकप्रतिनिधींच्या संख्या बाळाच्या आधारे काहीच उरलेले नाही.
– भाजपनेच आघाडीत “सोडले” का??
पण महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा पट लक्षात घेऊन भाजपला “मोकळी वाट” करून देण्याच्या दृष्टीने “व्यूहरचना” करत राज ठाकरे यांना भाजपनेच महाविकास आघाडीत “सोडले” आहे का?? असा संशय येण्यासारखे वातावरण आहे, म्हणूनच राज ठाकरेंनी 96 लाख मतदार हे मतदार याद्यांमध्ये घुसविण्याचा आरोप करून महाविकास आघाडीला निवडणुकीवर बहिष्कारच्या दिशेने खेचून घेणे चालविले आहे काय??, असा सवाल तयार झाला आहे.
Goud Bengal has added 96 lakh people to the voter lists; Does Raj Thackeray want to push the Maha Vikas Aghadi towards boycotting the elections??
महत्वाच्या बातम्या
- Belgian Court : फरार मेहुल चोक्सीला भारतात परत पाठवण्यास मंजुरी; बेल्जियम न्यायालयाचा निकाल
- Pakistan Airstrike, : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; युद्धबंदीचा भंग, सीमावर्ती भागातील अनेक घरे लक्ष्य
- पश्चिम महाराष्ट्रातल्या स्वबळाची शिंदे सेनेकडून चाचपणी; शासनाच्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यावर भर!!
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- तेजस्वींचा नोकरीचा दावा खोटा, 3 लाख कोटींचे बजेट, पगार वाटण्यासाठी 12 लाख कोटी गरजेचे आहेत, कुठून आणणार?